• Total Visitor ( 711419 )
News photo

थाटे गावात दुष्काळाची भीषण परिस्थिती; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

Raju Tapal publisher October 03, 2026 44

थाटे गावात दुष्काळाची भीषण परिस्थिती; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील थाटे गावात दुष्काळामुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह पाळीव जनावरांच्या जीवनावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. गावातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गावातील शोभा फुंदे आणि ग्रामस्थांनी व्हिडीओच्या माध्यमातून गावातील सद्यस्थिती मांडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दूरवर जावे लागत असून, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. पाण्याअभावी पाळीव जनावरांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

दुष्काळाची ही गंभीर परिस्थिती प्रशासनाने गांभीर्याने घेऊन थाटे गावातील पाणीटंचाईची तातडीने पाहणी करावी आणि ग्रामस्थांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पाण्यासाठी सुरू असलेली ग्रामस्थांची ही धडपड प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज अधोरेखित करत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement