• Total Visitor ( 724603 )
News photo

कोंढापुरी येथे भाद्रपद बैलपोळा सण साजरा...

Raju Tapal publisher October 11, 2026 43

कोंढापुरी येथे भाद्रपद बैलपोळा सण साजरा...





विजय ढमढेरे 



शिरूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे  भाद्रपद बैलपोळा सण साध्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. बैलांना अंघोळ घालून बैलांच्या शिंगांना रंग लावून,गळ्यात फुलांचे हार घालून,पाठीवर भंडा-याची उधळण करत, चाबकाचे‌ फटके बैलांना न मारता,चाबकाचा‌ फटाक्यासारखा‌ आवाज काढत,वाजंत्र्याच्या साथीत शनिवारी संध्याकाळी मिरवत-मिरवत हनुमान मंदीरा-समोर मारूतीचे दर्शन घेण्यासाठी शेतक-यांनी बैलांना आणले होते. देवाचे दर्शन केल्यानंतर बैलांना घरी नेवून सुवासिनींच्या हस्ते बैलांचे पुजन करून शेतक-यांनी पुरणपोळीच्या नैवेद्याचा घास बैलांना खावू घातला.

ज्या शेतक-यांना बैल नाहीत त्या शेतक-यांनी मातीचे बैल बाजारातून खरेदी करून घरीच मातीच्या बैलांची पुजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला.

सध्या दुष्काळाचे सावट असल्याने,पावसाचा अभाव असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून शेतक-यांकडून रंगीबेरंगी हिंगूळ,सुताची मोरखी,घुंगरमाळा,पाठीवरच्या झुली आदी बैलांना सजवणा-या साहित्यांची खरेदी करण्यात आलेली नसल्याने बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याचे दिसून आले.

सद्यस्थितीत शेतीमशागतीची कामे करण्यासाठी शेतक-यांचा भर यांत्रिककरणावर असल्याने शेतक-यांकडे पूर्वीसारखी बैलांची संख्या दिसून येत नाही.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement