टिटवाळ्यात २६ ऑगस्टला खान्देशी कौटुंबिक स्नेहसंमेलन
भाग्यश्री पाटील.
टिटवाळा :- खान्देश उत्कर्ष सामाजिक संस्था,टिटवाळा यांच्या वतीने खान्देशी समाजबांधवांसाठी ‘खान्देशी कौटुंबिक स्नेहसंमेलन २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार,२६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गुरवली रोड,काळू नदीकाठी असलेल्या रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट,टिटवाळा पूर्व येथे हा स्नेहसंमेलन सोहळा पार पडणार आहे. खान्देशातील बंधू-भगिनी व नागरिकांना एकत्र आणणे,परस्पर स्नेह आणि सामाजिक एकोपा वाढविणे,तसेच नव्या पिढीला खान्देशी समाजाची संस्कृती,परंपरा आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देणे हा या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी थविल,नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर,नगरसेवक संतोष आप्पा तरे,नगरसेवक बंदेश जाधव,माजी नगरसेवक सुरेश भोईर,शिवसेना शहरप्रमुख किशोरभाई शुक्ला,शिवसेना विभागप्रमुख दादा खिस्मतराव,भाजपचे परेश गुजरे,रिजन्सी सर्व फेडरेशनचे अध्यक्ष दीपक कांबळे,मनसे उपशहर प्रमुख दिनेश भोय,अण्णा तरे,पत्रकार राजू टपाल यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष प्रवीण वाणी,कार्याध्यक्ष ॲड.विलास भारती,उपाध्यक्ष विवेक शुक्ल, सरचिटणीस राजेंद्र मेखे,खजिनदार संजय चौधरी,रविंद्र पिंपळे,पदमसिंह बाविस्कर,अरुण सोनार,दिलीप राठोड,नरेंद्र बाविस्कर,दिगंबर सोनार,दीपक सोनार,मनीषाताई वारडे,शिवव्याख्यात्या यशोदाताई पाटील,कल्पनाताई चौधरी,विजयाताई बडगुजर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्नेहसंमेलनाची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. विलास भारती यांनी दिली असून,खान्देशी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.