• Total Visitor ( 675013 )
News photo

दत्तू शेवाळे यांची शहापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

Raju Tapal publisher August 24, 2026 35

दत्तू शेवाळे यांची शहापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती



राजू टपाल.

शहापूर :- सह्याद्री आदिवासी म. ठाकूर-ठाकूर समाज उन्नती मंडळ,ठाणे जिल्हा यांच्या वतीने दत्तू सखाराम शेवाळे यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष जानू पांडू हिरवे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी सोपवली आहे. मू.स्वामी समर्थ निवास,यमुनानगर,चेरेपोली,शहापूर येथील सह्याद्री आदिवासी म.ठाकूर-ठाकूर समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले जात आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत दत्तू शेवाळे यांची शहापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर आदिवासी समाजाच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी तसेच समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रभावीपणे कार्य करण्याची अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे. दत्तू शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल आदिवासी समाजातून त्यांचे अभिनंदन होत असून,त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement