राजेंद्र जाधव यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन
टिटवाळा:- येथील राजेंद्र जाधव यांच्या मातोश्री गं.भा.ताराबाई गणेशनाथ जाधव (मूळ रा. बहीरवाडी,ता.नेवासा,जि.अहिल्यानगर) यांचे मंगळवार,दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता टिटवाळा येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जाधव परिवारावर शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर आज दुपारी २.०० वाजता अमरधाम स्मशानभूमी,सांगोडा रोड,मांडा,टिटवाळा (प.),ता. कल्याण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. समस्त जाधव परिवाराने सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांना अंत्यदर्शन व अंत्यविधीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.