• Total Visitor ( 655810 )
News photo

ह.भ.प.अनिताताई जाधव यांच्या किर्तनाचे शिक्रापूर येथे आयोजन 

Raju Tapal publisher August 04, 2026 29

ह.भ.प.अनिताताई जाधव यांच्या किर्तनाचे शिक्रापूर येथे आयोजन 

        

शिरूर (प्रतिनिधी):-  कै.लतामाई विश्वासराव मांढरे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दि‌.४ आॅगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजमाता जिजाऊ पुरस्कार सन्मानित,समाजप्रबोधनकार ह.भ.प.अनिताताई रावसाहेब जाधव यांच्या सुश्राव्य किर्तनाचे शिक्रापूर येथील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री.संजीव मांढरे यांनी ही माहिती कळविली. किर्तन संपल्यानंतर दुपारी १२ ते ३ यावेळेत उपस्थितांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे सर यांनी कळविले.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement