• Total Visitor ( 708977 )
News photo

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा...

Raju Tapal publisher August 04, 2026 57

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा;रणजित दळवी,सुनील लवाटे,जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई:- मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. कै.महेश बोभाटे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांना,तर २०२६ चा पुरस्कार सुनील लवाटे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच,कै.आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२५ बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना,तर २०२६ चा पुरस्कार स्वदेश घाणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप रुपये १० हजार रोख,गौरवचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून,ही माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघाला तब्बल ८४ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची परंपरा संघाने सातत्याने जपली आहे. क्रीडा पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. पुरस्कार विजेत्यांचा गौरव मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विशेष क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. क्रीडा पत्रकारितेच्या माध्यमातून खेळाडूंची कामगिरी,त्यांचा संघर्ष आणि क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करणे,हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाने स्पष्ट केले आहे. अशी माहिती कार्यवाहक शैलेंद्र शिर्के यांनी दिली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement