कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात आज पावसाचा येलो अलर्ट
शिरूर:- कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात आज शनिवार दि.१९ सप्टेंबरला हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील रायगड,रत्नागिरी,मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार,धुळे,जळगाव,नाशिक,अहिल्या नगर,पुणे,सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,हिंगोली,लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यता वर्तवली आहे.