• Total Visitor ( 695495 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

Raju Tapal publisher July 29, 2026 555

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

         

शिरूर (प्रतिनिधी: विजय ढमढेरे):- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरूपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महर्षी व्यास यांचे स्मरण आणि पूजन केले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी व्यास यांचे स्मरण करण्यामागे संदेश असा आहे की,ज्ञान देणारा,विवेक जागवणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा प्रत्येकजण गुरु असतो. गुरु केवळ शिक्षण देत नाही,तर व्यक्तिमत्त्व घडवतो, संस्कार रुजवतो आणि सत्याचा मार्ग दाखवतो. भारतीय संस्कृतीत गुरू शिष्य ही मोठी परंपरा आहे. प्राचीन काळापासून ती सुरू आहे. आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी गुरूंचा सन्मान केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. व आपल्या गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला. इयत्ता दहावी 'अ'  चे विद्यार्थी आणि त्यांचे वर्गशिक्षक सुरेंद्र ठुबे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रशालेतील सर्व गुरुजनांचे पाद्यपूजन विद्यार्थांनी केली. त्यानंतर गुलाब पुष्प,श्रीफळ आणि विठ्ठलरुक्मिणी यांची मूर्ती गुरुपौर्णिमेची भेट म्हणून सर्व गुरुजनांना देण्यात आली.  यावेळी,वैष्णवी सोनवणे,प्राजक्ता ढमढेरे,सिद्धी सूर्यवंशी,या विद्यार्थांनिनी आपल्या मनोगतामधून आपल्या गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला. विद्यार्थांनी संगीताच्या तालावर खास गुरुपोर्णिमानिमित्त गुरुवंदना सादर करण्यात आली. लेखक प्रा.कुंडलिक कदम यांनी गुरुपौर्णिमा आणि तिचे अध्यात्मिक महत्व या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे आणि उपशिक्षक शिवाजी आढाव यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रांजली भुजबळ,क्षितिजा खैरनार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सोहम माळी याने मानले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव  दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,सचिव अरविंददादा ढमढेरे, जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,संचालक महेशबापू ढमढेरे,

 यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

     


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026