तळेगाव ढमढेरे येथील वेळनदी पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद
शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील वेळनदीला महापूर आल्याने तळेगाव ढमढेरे बाजारमैदानाजवळील वेळनदीवर असणारा पूल खचल्याने कासारी फाट्याकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात जोरदार मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तळेगाव ढमढेरे गावाजवळून वाहणा-या वेळ नदीला महापूर आला होता.महापुराचे पाणी आठवडे बाजार भरत असलेल्या बाजार मैदानात शिरले होते. वेळ नदीला आलेल्या महापुरामुळे तळेगाव ढमढेरे गावातील बाजार मैदानाजवळील वेळ नदीवर असलेला पूल खचून पुलाची अतिशय दुरवस्था झाल्याने तळेगाव ढमढेरे गावावरून कासारी फाटा येथे अहिल्यानगर -पुणे महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याचे तेथील नागरिकांनी कळविले.