• Total Visitor ( 666392 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात 

Raju Tapal publisher August 15, 2026 123

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात 



शिरूर (प्रतिनिधी):- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक  महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीच्या घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांच्या हस्ते प्रशालेत झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,संचालक महेशबापू ढमढेरे,राहूल गुजर,राजेश ढमढेरे,परेश सातपुते उपस्थित होते. बँडपथकाच्या तालावर सुंदर कवायतीचे सादरीकरण विद्यार्थांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने समर गीते आणि देशभक्तीपर गीते या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी चांगला प्रतिसाद दिला. तुषार खळदकर मॅनेजर युवा अनस्टॉपेबल,रवी गव्हाणे,विठ्ठल शेलार,युवराज तोडकर,नवनाथ भुजबळ, दीप्ती पंडित,प्रशांत भुजबळ यांचा संस्थेला मदत केल्याबद्दल तर पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल डॉ रुपाली ढमढेरे यांचा आणि सोनाली जाधव हिचा सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल,श्रद्धा कऱ्हेकर हिला मिस गॉरजियश फेस ऑफ इंडिया 2026, या पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय नरके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक दहिफळे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपप्राचार्या सुनीता पिंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा कुंडलिक कदम यांनी केले. नागनाथ शिंगाडे,भगवान खुर्पे,मयूर भुजबळ,साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन मुसमाडे,उपप्राचार्य पराग चौधरी,मनोज आल्हाट,गुलाबराव गवळे,राजेंद्र कऱ्हेकर,सचिन पंडित,राजेंद्र केदारी यांच्यासह प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement