• Total Visitor ( 682016 )
News photo

गुजर प्रशालेतील २८५ विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ कुपनचे वितरण

Raju Tapal publisher August 30, 2026 239

गुजर प्रशालेतील २८५ विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ कुपनचे वितरण



शिरूर (प्रतिनिधी):- तळेगाव ढमढेरे,ता.शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी’ ॲपच्या ‘स्टडी बडी’ कुपनचे वितरण शनिवार दि.२९ आॅगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि मोबाईलचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइडच्या अध्यक्षा रोटेरियन वैशाली देव,डायरेक्टर रोटेरियन शेखर आघारकर,रोटेरियन राधा गोखले कम्युनिटी हेड आणि रोटेरियन सुनीता केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरेचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक रवींद्र सातपुते, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रोटेरियन वैशाली देव यांनी ‘स्टडी बडी’ ॲप विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये गुणात्मक बदल घडून येण्यास मदत होईल,तसेच मोबाईलचा वापर योग्य आणि विधायक पद्धतीने करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागेल,असे त्यांनी नमूद केले. मानद सचिव अरविंददादा ढमढेरे व उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता अभ्यास आणि ज्ञानवृद्धीसाठी करावा,असे आवाहन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक दहिफळे यांनी केले. यावेळी पालक मनोगत व्यक्त करताना रवींद्र पाटील यांनी ‘स्टडी बडी’ ॲपच्या वापरातून आलेले आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमात फोटो एडिटिंग स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक सोहम माळी,द्वितीय क्रमांक मयुरी निंबोळे,तर तृतीय क्रमांक प्रांजल भुजबळ यांनी मिळविला. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशालेतील तब्बल २८५ विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे कुपन वितरित करण्यात आले. या ॲपचा विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो, याबाबतची सविस्तर माहिती उपशिक्षिका निशा शितोळे यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परदेशी यांनी केले,तर प्रभारी पर्यवेक्षक रवींद्र सातपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारा आणि मोबाईलचा सकारात्मक व शैक्षणिक वापर करण्यास प्रेरणा देणारा हा उपक्रम प्रशालेसाठी निश्चितच कौतुकास्पद ठरला. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement