टिटवाळ्यातील ज्येष्ठ डॉक्टर डॉ. रविंद्र पाटील यांचे निधन...
वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,वैद्यकीय क्षेत्रात शोककळा...
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळ्यातील ज्येष्ठ वैद्यकीय क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि रुग्णसेवेला वाहून घेतलेले डॉ. रविंद्र पाटील यांचे रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने टिटवाळा परिसरात शोककळा पसरली आहे.डॉ. रविंद्र पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना रुग्णसेवेला महत्त्व दिले. त्यांच्या कार्यातून अनेक रुग्णांना सेवा मिळाली. त्यांच्या निधनामुळे टिटवाळ्यातील वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असून,त्यांची रुग्णसेवा आणि त्यांनी जपलेली माणुसकी कायम स्मरणात राहील.त्यांच्या निधनाने कुटुंबीय,आप्तेष्ट,मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली...
परमेश्वर दिवंगत डॉ. रविंद्र पाटील यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.