• Total Visitor ( 745323 )
News photo

स्वच्छता हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली...

Raju Tapal publisher October 27, 2026 16

स्वच्छता हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली...



स्वच्छ रुग्णालये ही केवळ व्यवस्था नव्हे,तर रुग्णांच्या सुरक्षिततेची हमी,आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास पवार यांचे प्रतिपादन...



ठाणे :- स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा आणि कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे.स्वच्छ रुग्णालयातून रुग्णांना सुरक्षितता,विश्वास आणि आरोग्यदायी वातावरण मिळते,असे प्रतिपादन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी केले.केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विशेष मोहीम ६ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ठाणे येथील वि.सा. सामान्य रुग्णालयापासून या मोहिमेची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृतीतून स्वच्छतेचा संदेश दिला.या मोहिमेत रुग्णालयातील वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग, स्वच्छतागृहे आणि परिसराची स्वच्छता,अनावश्यक साहित्याचे व्यवस्थापन तसेच जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट यावर भर देण्यात आला. विविध विभागांतील अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.रुग्णालयातील स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून ती अधिक प्रभावी होऊ शकते.स्वच्छ परिसर,योग्य कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या सवयी यांमुळे आरोग्यदायी वातावरणनिर्मितीला हातभार लागतो. त्यामुळे स्वच्छतेला रोजच्या कामकाजाचा अविभाज्य भाग बनविणे आवश्यक आहे,असा संदेश डॉ. पवार यांनी दिला.स्वच्छता ही जबाबदारी आणि आरोग्याची पहिली पायरी मानून प्रत्येकाने आपल्या परिसरापासून सुरुवात केली,तर स्वच्छ आणि सुरक्षित आरोग्यव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे अधिक सुलभ होईल.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement