• Total Visitor ( 747861 )
News photo

मांडा पश्चिमेतील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाई...

Raju Tapal publisher October 27, 2026 55

मांडा पश्चिमेतील अनधिकृत बांधकामांवर पुन्हा कारवाई...



सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांची कारवाई....



राजू टपाल.



टिटवाळा :- मांडा पश्चिमेतील सर्व्हे नंबर १७८ मध्ये सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामाविरोधात अयाज मोहम्मद अली कबाडी यांनी केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरेकर यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती.सहायक आयुक्त अनिता राठोड यांनी 10 सप्टेंबर रोजी धडक कारवाई करत तीन अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम निष्कासित केले होते. उर्वरित गाळ्यांचे बांधकाम खाली करण्यासाठी काही दिवसाची मुदत देण्यात आली होती.मांडा पश्चिमेतील सर्व्हे नं. १७८ येथे मुखलिस खालिक कबाडी,इफ्तिकार खालिक कबाडी,जुल्फेकार खालिक कबाडी व इतर व्यक्तींकडून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बांधकामाबाबत यापूर्वीही महापालिकेकडे अनेक अर्ज व तक्रारी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. संबंधित व्यक्तींविरोधात एम.आर.टी.पी. कायद्यानुसार प्रकरण दाखल झाल्याचाही उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने तोडक कारवाई केली होती,मात्र उर्वरित बांधकाम कायम असल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. केडीएमसी प्रशासनाने आज पुन्हा तोडक कारवाई करीत तीन गाळ्यावर तोडक कारवाई केली. तर उर्वरित तीन गाळ्यांमध्ये रहिवास असल्यामुळे पुढील आठ दिवसांची मुदत देऊ केली.सदरची कारवाई ही केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार व अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरेकर यांच्या निर्देशानुसार अ-प्रभागाच्या सहायक आयुक्त अनिता राठोड,अनधिकृत बांधकाम पथकाचे कर्मचारी,कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस,ठेकेदाराचे 10 कर्मचारी व एक जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement