• Total Visitor ( 685476 )
News photo

तळेगाव येथील ढमढेरे महाविद्यालयात संस्कृत सप्ताह साजरा 

Raju Tapal publisher August 31, 2026 181

तळेगाव येथील ढमढेरे महाविद्यालयात संस्कृत सप्ताह साजरा 



शिरूर:- महाराष्ट्र शासन (सहसंचालक,उच्च शिक्षण पुणे विभाग) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे यांच्या निर्देशानुसार साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळेगाव ढमढेरे येथे संस्कृत सप्ताह अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन - २०२० नुसार भारतीय ज्ञान,विज्ञान व तत्वज्ञान परंपरेचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी आणि संस्कृत भाषेची ओळख व माहिती होण्यासाठी दि. २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीमध्ये संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. या नियोजनातील उपक्रम म्हणून तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयातही संस्कृत सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रमोद पाटील यांनी "संस्कृत:भारताची सांस्कृतिक अस्मिता" या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी संस्कृत भाषेचा उगम,संस्कृत भाषेचे व्याकरण,संस्कृत भाषेतील साहित्यसंपदा तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. तसेच संस्कृत भाषेच्या संदर्भात प्रश्नोत्तरे घेण्यात आली. संस्कृत सप्ताह निमित्त आयोजित सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी,शिक्षण प्रसारक मंडळ,तळेगाव ढमढेरे संस्थेचे संचालक माननीय महेशबापु ढमढेरे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.पराग चौधरी पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे,प्रा.विवेक खाबडे प्रा.शाकुराव कोरडे,प्रा.अश्विनी पवार,प्रा.अजिता भुमकर,प्रा.विद्या टुले,प्रा. कांचन गायकवाड,प्रा.किर्ती कापरे,प्रा.अविनाश नवले व प्रा.राहुल महाजन आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement