• Total Visitor ( 685482 )
News photo

चिंबळीतून ७८ वर्षीय वृद्ध बेपत्ता

Raju Tapal publisher August 31, 2026 23

चिंबळीतून ७८ वर्षीय वृद्ध बेपत्ता



आठवडा उलटला तरी शोध नाही कुटुंबाची चिंता वाढली



आळंदी :- चिंबळी (ता.खेड) येथून आठवडाभरापूर्वी घराबाहेर गेलेले ७८ वर्षीय जेष्ठ नागरिक बबन शिवराम बहिरट यांचा अद्याप शोध लागू शकला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे.आळंदी पोलिस स्टेशनमध्ये त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून आळंदी पोलिसांसह,बहिरट कुटुंबीय,चिंबळी ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. बबन शिवराम बहिरट हे २३ ऑगस्ट रोजी घराबाहेर गेले आहेत ते अद्याप घरी परतले नाहीत.आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सदर व्यक्ती शोधण्याबाबत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बेपत्ता झालेली सदर व्यक्ती  ५ फूट ६ इंच उंची असलेली गहू वर्णीय व्यक्ती असून वयपरत्वे सडपातळ बांधा आहे.त्यांच्या अंगावर राखाडी (ग्रे) टी-शर्ट त्यावर काळे पट्टे आहेत व राखाडी (ग्रे ) कलरची बरमूडा घातलेली आहे. त्यांना विस्मरणाचा आजार.सदर वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास कृपया तत्काळ खालील नंबरवर संपर्क साधावा.मोबाईल नंबर 

8459178598,मोबाईल नंबर 

9850957679,मोबाईल नंबर 9767167626 



 बबन बहिरट


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement