• Total Visitor ( 704252 )
News photo

कोंढापुरी येथील माजी सरपंच बापुराव धोंडीबा गायकवाड यांचे निधन 

Raju tapal March 02, 2026 244

कोंढापुरी येथील माजी सरपंच बापुराव धोंडीबा गायकवाड यांचे निधन 

          

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील माजी सरपंच बापुराव धोंडीबा गायकवाड यांचे रविवार दि‌.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. रविवारी दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता कोंढापुरी येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारास राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक,व्यापार,उद्योग,पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी,त्यांचे नातेवाईक,ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक रामदास बापूराव गायकवाड,कोंढापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन,माजी उपसरपंच प्रकाश बापुराव गायकवाड यांचे ते वडील होते. मंगळवार दि.३ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे माजी सरपंच बापुराव धोंडीबा गायकवाड यांच्या दशक्रिया विधीचे गायकवाड परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आलेले असून श्री.क्षेत्र आळंदी येथील प्रवचनकार ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026