• Total Visitor ( 690730 )
News photo

केडीएमसीची बल्याणीमध्ये अनधिकृत बांधकामावर धडक मोहीम...

Raju Tapal publisher September 03, 2026 91

केडीएमसीची बल्याणीमध्ये अनधिकृत बांधकामावर धडक मोहीम...



६५ नवीन फाउंडेशनवर कारवाई....अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकांमध्ये खळबळ...



राजू टपाल.



टिटवाळा :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभागाच्या वतीने बल्याणी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी,कामगार तसेच महानगरपालिकेच्या पोलीस पथकाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. बल्याणी येथील डोंगरवाली मैया मंदिराच्या पाठीमागील तसेच NRC कंपनीच्या मागील बाजूस अनधिकृतपणे सुरू असलेल्या बांधकामांवर पालिका पथकाने कारवाई केली. या मोहिमेत तब्बल ६५ नवीन फाउंडेशन (जोते) तोडण्यात आले. परिसरात नवीन बांधकामासाठी उभारण्यात येत असलेल्या फाउंडेशनवर कारवाई करण्यात आल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील इतर अनधिकृत बांधकाम करणारे विकासक आणि संबंधितांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. भविष्यातही अशा प्रकारे अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026