11 वर्षांचा प्रिन्सकुमार बेपत्ता.....अपहरणाची शक्यता
कल्याण :- कल्याण पूर्वमधील तिसगाव परिसरातून एक 11 वर्षांचा मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झाला असून, त्याच्या अपहरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रिन्सकुमार दिनेश जैसवार असे या मुलाचे नाव असून तो औदुंबर छाया को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आदर्श नगर, गावदेवी रोड, तिसगाव, कल्याण पूर्व येथे वास्तव्यास होता. मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील हा मुलगा 15 जुलै 2025 रोजी दुपारी 4.45 वाजण्याच्या सुमारास साहिल प्लाझा परिसरातून अचानक बेपत्ता झाला.
त्याचा मामा सहेंद्र रामकुमार जैसवार यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गु.र.नं. 556/2025 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपासात असा संशय व्यक्त करण्यात आला आहे की, कोणीतरी अज्ञात इसमाने प्रिन्सकुमारच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, त्यास कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असावे.
प्रिन्सकुमारचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. पोलीस यंत्रणा सतर्क असून, नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
PSI एस.आर.मुंढे – 9594929916
कोळसेवाडी पोलीस ठाणे – 0251-2363593