एका गुन्ह्याची उकल करताना २२ गुन्ह्यांची उकल; इंदापूर पोलीसांची कामगिरी
शिक्रापूर ( प्रतिनिधी ) :- इंंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे घडलेल्या जबरी चोरीचा छडा लावत इंदापूर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने एका गुन्ह्याची उकल करताना एकूण २२ गुन्ह्यांची उकल केली.
१० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री बद्रीनाथ रामू राठोड रा.रूई ता.बारामती हे वडापूरी येथील वरकुटे खुर्द रोडवरून जात असताना अज्ञात दोघांनी अडवून,चाकूचा धाक दाखवत मारहाण केली होती.त्यांच्याकडील मोबाईल, मोटरसायकल,ट्रकची बॅटरी,२ हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण २८ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्यासह पोलीस पथकाने शिताफीने सापळा रचून खंडू उर्फ राहूल अशोक महाजन वय - १९ वर्षे रा.वडापूरी इंदापूर व एक विधीसंघर्षित बालक अशा दोघांना ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली.त्यांच्याकडून एकूण २८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक तपास केला असता आरोपींनी सचिन अरूण कांबळे रा.वरकुटे खुर्द,साहिल विलास चौधरी,रा.उरूळीकांचन, रोहित दत्तात्रय कटाळे रा.उरूळी कांचन ता.हवेली यांच्या मदतीने मागील २ वर्षात इंदापूर तालुका व परिसरात एकूण २२ गुन्हे केल्याची कबुली दिली. शेतक-यांच्या विहीरींवरील पाण्याच्या मोटारी १३ गुन्हे,सोलर प्लेटा चोरणे ३ गुन्हे,शेळ्या,बोकडे चोरल्याची आरोपींनी कबुली दिली.