• Total Visitor ( 85058 )

आनंद वाटणारा ध्येयवेडा डॉक्टर "आनंद खरात"

Raju Tapal December 28, 2022 187

आनंद वाटणारा ध्येयवेडा डॉक्टर "आनंद खरात"

संमोहन कार्यशाळेमुळे नवीन जीवन जगण्याची उमेद  

राजू टपाल. 

दादर :- आयुष्य जगताना दिवसेंदिवस वाढत जाणार मनातील ट्रेस,बिघडणार मानसिक संतुलन त्यामुळे कळत नकळत वाढत जाणारे शारीरिक व मानसिक व्याधी या सर्वावर लागलीच उपचार केले नाहीतर माणसाचा जीवन जगण्यातील आनंदच निघून जातो. मात्र यातून जर आपल्याला सावरायचे असल्यास नक्कीच डॉ.आनंद खरात यांच्या संमोहन शिबिरात प्रत्यक्ष भाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा. शिबिरात येणाऱ्या प्रत्येक जणाला आपल्या संमोहन शास्रातून आनंदी करणाऱ्याचा शंभर टक्के प्रयत्न करणाऱ्या या ध्येयवेड्या डॉ.आनंद खरात यांचा मोलाचा वाटा ठरत आहे. येणारा प्रत्येक जण अतिशय तणावाखाली येत असतो मात्र दोन दिवसांतच तणावमुक्त होऊन नवीन जीवन जगण्यासाठी उंच आकाशात भरारी घेण्यासाठी सज्ज होत असतो. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई दादर येथील संमोहन शिबिरात भाग घेतलेल्या सर्वच संमोहन विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतलेल्या सर्वांनाच याचा प्रत्यय आला. यात विविध क्षेत्रातील,विविध राज्यातून आलेल्या सर्व महिला पुरुषांना एक वेगळ्याच आयुष्याचा फील अनुभवयास मिळाला. 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःच्या मनामध्ये डोकावून पहात नसल्याने अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची लक्षणे दिसू लागतात. मात्र समोहनातून समृद्धीकडे जाण्याचा व त्याचा आपल्या स्व जीवनावर व इतरांना बाहेर काढण्याचा मूलमंत्र डॉ.आनंद खरात यांनी दिला. गेल्या २० वर्षांपासून संमोहन क्षेत्रात असलेल्या डॉ. आनंद खरात यांचे संमोहन विद्या प्रशिक्षण घेणाऱ्याला एक वेगळाच अनुभवायास मिळत आहे. डॉ. खरात यांची शिकविण्याची पद्धत खूपच वेगळी असून ते आपल्याला मनमोकळेपणे हातचे काहीही राखून न ठेवता सांगून टाकतात. अगदी क्लास सुरु होण्याच्या पहिल्या मिनिटांपासून ते क्लास संपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला ते आपलस करून शिकवतात. कुणीही काहीही कसेह प्रश्न विचारले तरी त्यांना समाधानकारक उत्तरे मिळवून अर्धवट ज्ञानापासून वंचित असणाऱ्यांना ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचे ते काम करत आहेत. दुसऱ्या दिवसाच्या शिबिरात त्राटक पद्धत म्हणजे काय,कशासाठी उपयोग केला जातो तसेच ते केल्याने कसे मन एकाग्र होते याबाबत ते सविस्तर माहिती देतात. तर प्रत्येक व्यक्तीला ते स्व संमोहन व पर संमोहन करण्यास भाग पाडतात जेणेकरून प्रत्येकाच्या मनातील भीती,न्यूनगंड बाहेर येईल. व्यक्त व्हा,मनातील सर्व समस्या दूर करा. आपोळ्या आर्थिक,शारीरिक अडचणींवर आपणच मात करून पुढे जाऊ शकतो असे ते आत्मविश्वासाने मनामध्ये ठसवतात. शिकण्या साठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला डॉ. आनंद खरात हे आपल्यातीलच एक वाटून सर्व समस्या सुखदुःख मोठ्या आनंदाने शेअर करून त्यावर मार्गदर्शन मिळवितात. भरपूर प्रॅक्टिकल,थिअरी,व्हॉइस ओव्हरचे तंत्र इत्यादी शिकविताना ते आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात. त्यातच कैलास खेर यांचे ओ सिकंदर,ओ सिकंदर असो किंवा दंगल दंगल गाण्याची प्रेरणा किंवा गोविंद बोलो गोपाळ बोलो या गाण्यांवर नाचत न येणाऱ्यालाही ठेका धरण्यास भाग पाडतात. यावेळी सर्वच जण अगदी बेधुंद होऊन त्यात सामील होऊन मनमुराद आनंद उपभोगत असतो. दुसऱ्या सत्रात प्रत्येक सहभागी झालेल्या सदस्याला आपल्या नातेवाईकांना बोलावून कार्यशाळेत भाग घेण्याची संधी देतात. सदरील वेळी बाळू मामाच्या नावाने चांगभलं या कलर्स मराठीवर सुरु असलेल्या सीरियलमध्ये काम करणारी तसेच सावित्री ज्योती,संगीत शोले,यदाकदाचित मध्ये काम करणारी सुप्रसिद्ध कलाकर ओशिनी साबळे हिने हि सहभाग घेऊन संमोहित होण्याचा फायदा घेतला. एकंदरीतच सदरील कार्यशाळेत आपल्या दोन दिवसात नवीन जगण्याचा संकल्प घेऊन सगळे प्रफुल्लित चेहऱ्याने व ठाम आत्मविश्वासाने मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज होत असतात. शेवटचे संगीताच्या ठेक्यावरच्या नाचगाण्याने प्रशास्तिपत्रक घेऊन सरांबरोबरच फोटोशेशन मध्ये सगळेच सामील होत एकमेकांना निरोप देण्यासाठी इच्छा नसतानाही गळाभेटीने हस्तोलंदनाने पुन्हा भेटण्याची इच्छा प्रकट करीत मार्गस्थ होतात ते नव्या आयुष्यात नवीन जगात पुन्हा जिंकण्याची उमेद घेऊनच.

Share This

titwala-news

Advertisement