अरणगाव ता.शिरूर येथील ऊसाच्या शेतात अफुची झाडे ; महिलेवर गुन्हा
अरणगाव ता.शिरूर येथील ऊसाच्या शेतात अफुची झाडे आढळल्याने महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पत्रकारांना दिली.
शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील गट नंबर ९० मध्ये ताई संतोष मकर यांनी विनापरवाना व्यावसायिक हेतूने विक्रीकरता ६९ अफुच्या झाडांची लागवड केल्याचे आढळले. त्या झाडांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रूपये असून अफुच्या ओल्या झाडांचे व बोंडाचे एकूण वजन सुमारे ९ किलो आहे. प्रतिकिलो ५० हजार रूपये दराप्रमाणे ४ लाख ५० हजार रूपये किंमत होत आहे.
पोलीस हवालदार किशोर तेलंग यांनी याबाबत फिर्याद दिली असून कारवाई करतेवेळी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, महसूल कर्मचारी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.