जानकी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
नानजीभाई ठक्कर व विश्वासराव आरोटे प्रमुख पाहुणे
राजू टपाल.
टिटवाळा:- श्री.बाळेश्वर विद्या प्रसारक मंडळ संचालित मांडा पश्चिमेतील जानकी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर,दैनिक गावकरी चे संपादक विश्वासराव आरोटे,टिटवाळा न्युज चे संपादक राजू टपाल,समाजसेवक कृष्णकांत दळवी,स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर सतीश वानखेडे उपस्थित होते.
यावेळी जानकी विद्यालयात मार्च 2025 मध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या भक्ती प्रदीप पवार,द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वेदांत अनंता पाटील,तृतीय क्रमांक मिळवलेल्या ईश्वरी दादाजी जगताप व चतुर्थ क्रमांक मिळवलेल्या राजश्री बाळू धिंदळे या विद्यार्ध्यांचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेचा निकाल 100 टक्के लागल्या बद्दल नानजीभाई ठक्कर यांनी शाळेला संपूर्ण छतावरील पत्रे नवीन देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच शाळेला जी काही मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. गरीब गरजू विद्यार्ध्यांना जी शैक्षणिक मदत लागेल किंवा त्यांच्या पालकांना जी आरोग्य सेवा लागेल त्यासाठी एक हि रुपया न घेता आपण सहकार्य करू असे सांगितले. दैनिक समर्थ गावकरीचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी शाळेला 11 हजार रुपयांची देणगी देण्याबरोबरच शाळेतील विद्यार्ध्यांना दप्तरे,वह्या,पुस्तके देण्याचे कबूल केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकड व संचालिका सुनीता काकड यांनी कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे यथोचित सन्मान केला. यावेळी शाळेच्या विद्यार्ध्यांनी विविध प्रकारचे गाण्यांवर नृत्य तसेच नाटिका सादर केल्या. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूपच मेहनत घेतली.