सांभाळण्यास दिलेल्या मुलाचे अपहरण करणा-या जोडप्यास अटक
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- सांभाळण्यास दिलेल्या ३ वर्षीय मुलाचे अपहरण करणा-या जोडप्यास रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी लुधियाना येथून अटक केली आहे.
पूजा देवी उर्फ वनिता अर्जून यादव वय -३७, अर्जूनकुमार वकिल कुमार यादव वय -३६ दोघेही रा.बिहार, सध्या रांजणगाव अशी अटक केलेल्या दोघा पत्नी,पतीचे नाव आहे.
पुजा देवी व अर्जूनकुमार यादव हे आठ - दहा महिन्यांपासून भाड्याने राहात होते. काजल पडघान या त्यांचा मुलगा आयुष याला सांभाळण्यासाठी शेजारी राहाणा-या पुजा देवी यांच्याकडे देवून कामावर जात होत्या.
तांत्रिक विश्लेषण,गोपनीय माहितीच्या आधारे पुजा देवी व अर्जूनकुमार यादव हे लुधियाना येथे पोहोचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ लुधियाना येथे पाठविण्यात आले.लुधियाना येथील पोलिस निरीक्षक सुरेशकुमार रामल, गुरूमितसिंग यांना तपास पथकाला मदत करण्याची विनंती केली. रांजणगाव पोलीसांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपींना अटक केली.
सांभाळण्यासाठी दिलेल्या आयुषचा लळा लागल्याने तसेच त्यांना मुलबाळ होत नसल्याने आयुषला पळवून नेल्याचे आरोपींनी पोलीसांना सांगितले.