गुजर प्रशालेतील विद्यार्थ्याची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड
प्रतीक राजशेखर बिराजदार याची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड
शिक्रापूर (प्रतिनिधी):- विभागीय क्रीडा संकुल सोलापूर येथे पार पडलेल्या विभागीय तलवारबाजी स्पर्धेत स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचा विद्यार्थी प्रतिक राजशेखर बिराजदार याने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात विभागीय स्पर्धेत फॉइल या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला असून त्याची दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ पासून औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांनी दिली. या विद्यार्थ्यांला क्रीडा शिक्षक राजेंद्र भगत व नंदा सातपुते यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते मानद सचिव अरविंददादा ढमढेरे ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.