• Total Visitor ( 368838 )
News photo

मान्सून अखेर केरळात दाखल

Raju tapal May 24, 2025 59

मान्सून अखेर केरळात दाखल

भारतीय हवामान विभागाची घोषणा

आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री



मुंबई:- अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे.भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे.यंदा लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.२४ तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात होता.मात्र त्यापूर्वीच मान्सूनने केरळात हजेरी लावली आहे. 



यापूर्वी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून लवकर आला होता.२३ मेच्या आसपास मान्सून केरळात पोहोचण्याची ही दोन वर्षे सोडली तर इतर वेळी मान्सून उशिरानेच आला होता. अनेकदा तर अल निनोसारख्या प्रभावामुळे मान्सून केरळच्या वेशीवरच रेंगाळला होता.यामुळे पुढेही तो जून संपला तरी पोहोचू शकलेला नव्हता.केरळमध्ये सरासरी मान्सून दाखल होण्याची तारीख १ जून आहे. परंतू, १९१८ मध्ये सर्वात आधी म्हणजेच ११ मे रोजी दाखल झाला होता. तर सर्वात उशिरा  १९७२ मध्ये दाखल झाला होता. २०१६ मध्ये मान्सून ९ जूनला दाखल झाला होता.



हवामान विभागानुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.आयएमडीचा अंदाज २७ मे होता, त्यापूर्वीच पाऊस दाखल झाला आहे. याच काळात हा मान्सून नैऋत्य मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर या भागात पुढे सरकणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, यामुळे मान्सूनच्या प्रवासासाठी पुढील ३६ तास महत्वाचे आहेत. पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस आणि वारा यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement