माझ्या मराठी शाळेमुळे मी घडले अभिनेत्री शिवली परब
कल्याण ची चुलबुली महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवली परब ही सोमवार दि २६ जानेवारी २०२६ रोजी तिच्या श्रीमती वेणुबाई आंबो पावशे विद्यालय कटेमानिवाली कल्याण पूर्व या शाळेत झेंडावंदन कार्यक्रमासाठी सकाळी ठीक ८.३० पासुन उपस्थित होती. यावेळी संस्थाध्यक्ष प्रमोद जाधव यांच्यासह तिने ध्वजारोहण केले व शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन स्वतःही एका देशभक्ती गीतावर नृत्याविष्कार केला.तिच्यासोबत बालवाडीपासून शिक्षण घेणारे तिचे सर्व वर्गमित्रही आले होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमधुर गीताने तिचे व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.मुलांची संगीत कवायत,बक्षीस वितरण,भाषणे व समुहगीतानंतर मुख्याध्यापक भानुदास मडके यांनी प्रास्ताविकात शाळेची गुणवत्ता व उपक्रम याबाबत माहिती देताना शिवलिच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर शिवली परब हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की वेणूबाई पावशे विद्यालय या मराठी माध्यमाच्या शाळेमुळेच आमच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण,संस्कार मिळाले त्यामुळेच आम्ही घडू शकलो.माझ्या यशात माझ्या शाळेचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे मी कधीही माझ्या मराठी शाळेला विसरणार नाही. माझ्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं कौतुक हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी मोठ्यासंखेने उपस्थित आजी माजी विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.संस्थासदस्य अभिमन्यू भालेराव,कालीराम चौधरी सर,बाळू सुतार सर,आशाताई शेडगे,आशाताई पावशे,दामोदर ताई,कांबळे ताई,कालबेंडे मॅडम,चतुर मॅडम,बावकर मॅडम,सोनवणे मॅडम,चौधरी मॅडम,जगे सर,नेमाडे मॅडम इत्यादीनी शाळेची चहुबाजूने प्रगती व्हावी व शाळा द्विगुणीत उत्तरोत्तर वाढत जाऊन शिवली सारखे अनेक विद्यार्थी घडावेत यासाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालिका तांबे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली