प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आरपीआयचे आमरण उपोषण मागे
Raju Tapal
December 31, 2021
49
प्रशासनाच्या लेखी आश्वासना
नंतर आरपीआयचे अमरण उपोषण मागे.
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील गोरगरीब आणि आर्थिक दृष्ट्या घटकांसाठी असलेली पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेची अंमलबजावणी करण्यास मनमाड नगर परिषदा सोबत भूमि अभिलेख विभाग टाळाटाळ करीत असल्याने आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष गुरु कुमार निकाळे व कार्यकर्त्यांनी अमरण उपोषण केले होते. रमाई घरकुल योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यास भुमी अभिलेख विभाग यांना येत्या दोन दिवसात भूमी मोजण्यासाठी लागणारी फी पालिका प्रशासनातर्फे भरण्यात येईल पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी केली जाईल. तसेच मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक चार सोबत इतर भागातील अतिक्रमणे कायम करण्यात यावे शहरात पंतप्रधान आवास आणि रमाई घरकुल आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागण्या सह इतर मागण्यासाठी आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष गुरु कुमार निकाळे व कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मंगळवारी पालिका प्रशासन विभाग यांनी दिलेल्या ेखी आश्वासनानंतर एक महिन्यासाठी स्थगित केले. एक महिन्यात समस्या सुट्ट्या नाही तर पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा निकाळे यांनी दिला.
या उपोषणाच्या वेळी आरपीआयचे जिल्हाप्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगा दादा त्रिभुवन, पि.आर.निळे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे, प्रमोद अहिरे, कपिल तेलुरे, सुरेश शिंदे, सागर शिरसाठ, वन देशी गांगुर्डे, पवन पवार, मुकुंद आहिरे, प्रदीप भोसले, संतोष अहिरे, विनोद अहिरे, उपस्थित होते. मनमाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध मागण्यासाठी अमरण उपोषण स्थगित करण्यात आल्यानंतर गुरु कुमार निकाळे यांना लिंबूपाणी देण्यात अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Share This