दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या वतीने शिक्रापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन
शिक्रापूर:- दुर्गा ब्रिगेडला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ध्येय,धोरणे,जाहिरनामा तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पक्षाची दिशा व भूमिका मांडण्यासाठी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील मिडास हाॅटेल मध्ये आज रविवार दि.१८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु.दुर्गा अभय भोर यांनी ही माहिती कळविली. दुर्गा ब्रिगेड पक्ष हा महाराष्ट्रातील ग्रामीण महिला युवक आणि शेतकरी घटकांना प्राधान्य देवून राज्याच्या सर्वांगिक विकासासाठी कटिबद्ध असून उद्योग रोजगार आणि आर्थिक विकास,ग्रामीण उद्योग व रोजगार,महिला सशक्तीकरण व सुरक्षा,पाणीपुरवठा व आरोग्य,कौशल्य विकास व प्रशिक्षण,शेती व गो उद्योग, ग्रामीण भागात २४ तास वीज व सोलर अभियान,वन्यप्राणी सुरक्षा व शेतकरी संरक्षण अभियान हा पक्षाचा संकल्प असल्याचे दुर्गा ब्रिगेड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु.दुर्गा अभय भोर यांनी कळविले.