• Total Visitor ( 368833 )
News photo

कोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन 

Raju tapal July 03, 2025 62

कोल्हापूरात मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन 



कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये एका मुख्याध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारुती व्हरकट असे या मुख्याध्यापकाचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित विहिरीजवळ जाऊन मृतदेह बाहेर काढला. यावेळी, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन विभागाच्या जवानांच्या मदतीने आज सकाळी मृतदेह विहरीतून बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणजे कागल नगरपालिकेच्या शाळेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे, व्हरकट यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement