पं. स.भातकुली च्या वर्ग १ ली च्या तीन दिवसीय प्रशिक्षणाला सुरुवात.
भातकुली मधिल ८० शिक्षक सहभागी
अमरावती दि.१० :- दि.९ जून २०२५ पासून पं. स.भातकुली अंतर्गत वर्ग १ च्या मराठी माध्यमाच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाला गोल्डन किड्स विद्यालय,अमरावती येथे सुरवात झाली आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात वर्ग १ ली ला शिकविणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी यांच्या करिता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.या शैक्षणिक वर्षा पासुन सीबीएस प्यार्टन लागु झाला आहे.या नविन अभ्यासक्रम व मुल्यमापनाचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.
दि.९ जून २०२५ ला सकाळी ठीक १०:०० वा या प्रशिक्षणाला सुरुवात झाली, हे प्रशिक्षण ९,१० व ११ जून असे तीन दिवस चालणार आहे.रामेश्वरजी माळवे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स.भातकुली),शकील अहमद खान सर (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स.भातकुली) उमाकांतजी सिंगरोल सर (मुख्याध्यापक, गोल्डन किड्स, विद्यालय, अमरावती)चंद्रकांतजी कडबे सर (विषय साधन व्यक्ती, पं. स.भातकुली) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये, आनंददायी वातावरणात प्रशिक्षणाला सुरुवात झाली.या प्रशिक्षणाच्या मध्ये केंद्र प्रमुख उपस्थित आहे.
पं. स.भातकुली अंतर्गत वर्ग १ ली. ला शिकविणाऱ्या जवळपास ८० शिक्षक बंधू भगिनींना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. बालगीते, कृतियुक्त गीते म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र, अधिकाऱ्यांनीही त्याविषयी आत्मीयता दाखवत, आपला सहभाग नोंदवत या गीतांवर ठेका धरला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिक्षण अंमलबजावणीच्या अनुषंगाने यंदापासून नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने राबवणूक केली जाणार आहे. त्या दृष्टीने यंदाच्या वर्षी इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिलीच्या शिक्षकांसाठी सध्या राज्यभर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.भातकुली तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण सुरु आहे.
=======
वैविध्यपूर्ण बाबींचा समावेश
नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणात कृतियुक्त शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यावसायिक शिक्षण आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. ध्येय, क्षमता, अध्ययन निष्पत्ती अन् त्यावर आधारित अध्ययन अनुभव या विषयांचे धडे प्रशिक्षणात दिले जात आहेत.यावेळी सुरू असलेल्या आनंददायी कृतियुक्त गीतात हे अधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. मोठ्या उत्साहाने त्यांनी या गीतांवर ठेका ठरला. उपस्थित सर्व शिक्षकांनी त्यांना दाद दिली.
=====
या प्रशिक्षणाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून राजकुमार गंगराळे,देवकी औघड मॅडम, ज्योती सानप मॅडम मार्गदर्शन करीत आहे,तर प्रशिक्षण समन्वयक म्हणून चंद्रकांत कडबे सर,कामकाज पाहत आहे. प्रशिक्षण स्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
==============