• Total Visitor ( 84797 )

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी परिसरात दाट धुक्याची चादर

Raju Tapal December 05, 2021 47

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी परिसरात दाट धुक्याची चादर 
  
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी परिसरात आज रविवार दि.५/१२/२०२१ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली होती 
कोंढापुरी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. वातावरणात बदल झाला होता. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला होता. 
आज रविवार दि.५/१२/२०२१ रोजी पहाटे तसेच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली होती. शिक्रापूर,रांजणगाव गणपती, खंडाळे, कोंढापुरी, कासारी, बुरूंजवाडी,मलठणफाटा,राऊतवाडी ,पुणे - नगर महामार्गावरील वाहनचालकांना दाट धुक्यामुळे हेड लॅम्प चा वापर करून मार्गक्रमण करावे लागत होते.
दाट धुक्यामुळे शेतातील पिकांवर रोगराईची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Share This

titwala-news

Advertisement