सोमेश्वर कारखाना निवडणुकीत वाघळवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार
------------------
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत वाघळवाडी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत वाघळवाडी गावास उमेदवारी देण्यात आलेली नाही. सोमेश्वर कारखाना उभारणीसाठी ग्रामस्थांनी स्वत:च्या मालकीच्या जमिनी विनामोबदला देण्यात आल्या.
कारखाना उभारणीत मोठा सहभाग असलेल्या वाघळवाडी ग्रामस्थांना कारखाना स्थापन झाल्यापासून संचालकपदी संधी देण्यात आली नाही.
सोमेश्वर कारखाना नोकरभरतीमध्ये सुद्धा युवकांना वगळले जाते. ६० वर्षे कारखाना स्थापन होवून उलटून गेली तरी उमेदवारी दिली नसल्याने यावर्षी उमेदवारी मिळेल अशी ग्रामस्थांना खात्री होती.पुन्हा डावलले गेले. या कारणांमुळे वाघळवाडी ग्रामस्थांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.