जीवनदीप महाविद्यालयात स्पंदन २०२६ महोत्सव संपन्न
विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना तसेच त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याला चालना देण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयाच्या व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरा जपण्याच्या हेतूने स्पंदन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे पूर्णपणे नियोजन व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनीच केले होते. महाविद्यालयात नृत्य, गायन,मेहंदी,एकपात्री,रांगोळी,फॅशन शो,फोटोग्राफी इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सुरुवात ही गणरायाच्या चरणी दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये आवडीने सहभाग घेतला. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष.रविंद्र घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रा. शिवाजी वाघमारे मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी यांनी लोककलेचा नजराणा सर्वांसमोर सादर केला. यामध्ये माझी मैना गावाकडे राहिली, संत जनाबाईंचे प्रबोधनपर गीत,भारुड इत्यादी गोष्टी त्यांनी सादरीकरण केल्या व विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने मार्गदर्शन केले. प्रा.महेश थोरात या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाघ,संचालक.प्रशांत घोडविंदे उपप्राचार्य.हरेंद्र सोष्टे, व्यवस्थापन शाखाप्रमुख.उल्हास गायकर,प्रा.निकिता घोडविंदे, प्रा. सचिन कांबळे,प्रा.शैलेजा मिश्रा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे एकत्रित सहभागाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.