राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन, नियुक्ती पत्र सोहळ्याचे आयोजन
शिरूर दि.२७ फेब्रुवारी २०२४ ( प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ) :-
राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग,पुणे जिल्हा वतीने राज्य दिनदर्शिका प्रकाशन, नियुक्ती पत्र ,स्मार्ट आय डी कार्ड वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरूवार दि.७/०३/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत पेरणे पोलीस चौकी समोरील समाज प्रबोधन भवन पेरणेफाटा पुणे - नगर रोड लगत टोलनाका याठिकाणी आयोजित केलेल्या राज्य दिनदर्शिका प्रकाशन सोहळा समारंभास महाराष्ट्र प्रदेश राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधूसुदनजी कुलथे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जेष्ठ समाजसेवक श्री.उत्तमराव आण्णा भोंडवे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कैलास करे, पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा दशरथ वाळके, दैनिक पुण्यनगरी चे वरिष्ठ उपसंपादक श्री.अशोक बालगुडे, जेष्ठ पत्रकार दिपक नायक, जेष्ठ पत्रकार मिडगुले प्रमुख अतिथी म्हणून राज्य दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहाणार असल्याची माहिती राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.विजयराव लोखंडे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे पाटील, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री.नितीन करडे यांनी कळविली.
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र,पुणे विभाग,पुणे जिल्हा सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहाणे बंधनकारक असून उपस्थित राहाणा-या पदाधिकारी व सदस्यांनाच नियुक्ती पत्र व स्मार्ट आय डी कार्ड वाटप करण्यात येणार असल्याचे श्री.विजयराव लोखंडे, श्री.सुनील भंडारे पाटील,श्री.नितीन करडे यांनी कळविले आहे. कार्यक्रमानंतर वैयक्तिक कोणालाही नियुक्तीपत्र व आय डी कार्ड पर्सनल दिले जाणार नाही असेही कळविले आहे.