• Total Visitor ( 582343 )

कोंढापुरी येथील गोसावी बाबा मंदीराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर 

Raju tapal March 15, 2026 114

कोंढापुरी येथील गोसावी बाबा मंदीराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर 

      

शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गायकवाड वाड्यातील गोसावी बाबा मंदीराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. २७ मे २०२५ रोजी झालेल्या मुसळधार,अतिमुसळधार संततधार पावसामुळे ससे वाड्याशेजारील गायकवाड जुन्या वाड्याच्या बुरूजावर असलेल्या गोसावी बाबा मंदीराच्या बुरूजाची  पडझड होवून बुरूजाचे दगड माती शेजारील ससे वाड्याच्या प्रवेशद्वारावर ढासळून मंदीराची काही प्रमाणात पडझड झाली होती. मंदीराला धोका निर्माण झाला होता.मंदीराच्या पायथ्याच्या पडझडीबाबत टिटवाळा न्यूज ने दि.२७ मे २०२५ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. मंदीर पुन्हा नव्याने बांधण्यासाठी गायकवाड व ससे वाड्यातील ग्रामस्थांनी एकत्रित येवून मंदिर नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला.त्यानूसार मंगळवार ३ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजल्यानंतर गोसावी बाबा मंदीरात अभिषेक व होमहवन करण्यात आला.

कोंढापुरी येथील शिवसेना शाखाध्यक्ष धनंजय अशोकराव गायकवाड यांच्या हस्ते सपत्निक अभिषेक व होमहवन करण्यात आला होता.पिंपरी सांडस ता.हवेली येथील पुरोहित महेंद्र धारणे यांनी पौरोहित्य केले.

मुर्ती बाजूला काढतोय,तुम्ही आशिर्वाद द्या. हे मंदीर पुन्हा बांधू,तुम्ही आम्हाला शक्ती द्या अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली . येळकोट,येळकोट जयमल्हार असा जयघोष यावेळी करण्यात येवून पुरोहित महेंद्र धारणे यांच्या पौराहित्याने मंदीरातील मुर्ती बाजूला काढण्यात आली होती. कोंढापुरी गावचे माजी उपसरपंच,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आशिषशेठ मुरलीधर गायकवाड,माजी उपसरपंच अर्जूनराव श्रीधरराव गायकवाड,विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन संपतराव आबासाहेब गायकवाड,जेष्ठ ग्रामस्थ अंकुशराव चांगदेव गायकवाड,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सदस्य ,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक,टिटवाळा न्यूज चे प्रतिनिधी,पत्रकार .विजय संभाजीराव ढमढेरे,जेष्ठ ग्रामस्थ सतिशराव ज्ञानेश्वर गायकवाड,जेष्ठ ग्रामस्थ दत्तात्रय मधुकरराव गायकवाड,युवा कार्यकर्ते चिंतामण सतिशराव गायकवाड हे अभिषेक,होमहवन कार्यक्रमास उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement