• Total Visitor ( 700899 )

नवी मुंबई १६ चोरीच्या गाड्या जप्त,दोन आरोपींना अटक

Raju tapal March 15, 2026 82

नवी मुंबई १६ चोरीच्या गाड्या जप्त,दोन आरोपींना अटक



नवी मुंबई :- पोलीस आयुक्तालयात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर कारवाई करताना,नेरुळ पोलिसांनी एक मोठे यश मिळवले आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी इम्रान शफीक शेख (१८) आणि सूरजकुमार राजन प्रसाद (२८) यांना अटक केली. आरोपींकडून ११ मोटारसायकली आणि ५ ऑटो रिक्षांसह एकूण १६ चोरीची वाहने जप्त करण्यात आली,ज्यांची किंमत अंदाजे १० लाख रुपये आहे. या कारवाईमुळे नेरुळ,खारघर,कामोठे,कळंबोली आणि तळोजा पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या १६ वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. नेरुळ पोलिसांच्या पथकाने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्याला त्याच्या पालकांकडे सोडण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026