आंबोडी - वनपूरी रस्त्याची दुरवस्था
---------------------
शिरूर दि.३ मार्च २०२४ ( प्रतिनिधी:- विजय ढमढेरे) :-
पुरंदर तालुक्यातील सासवडजवळील आंबोडी - वनपुरी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
सासवड पासून उरूळी कांचन गावाच्या दिशेने थोड्याच अंतरावर असलेल्या आंबोडी गावानजिक वनपुरी गावाकडे जाणा-या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
सासवड - जेजुरी बायपास रस्त्याचे काम चालू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून समजले. आंबोडी - वनपूरी रस्त्यावर बाह्यवळण रस्त्ता उंचीवरून जात असून पूलाखालून सासवड - वाघापूर रस्ता जात आहे.
सासवड पासून थोड्या अंतरावर आंबोडीनजिक रस्त्याची ब-याच दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे.
ब-याच दिवसांपासून पुलाखालील आंबोडी- वनपुरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही.
सासवड - वाघापूर फाटा रस्त्यावरून आंबोडी, वनपुरी, माळशिरस,सोनेरी, कुंभार वळण, उदाची वाडी, हगवणेवाडी, वाघेश्वरी मळा, पारगाव, सिंगापूर,शिंदवणे,डाळींब, उरूळी कांचन, आंबळे,टेकवडी,भुलेश्वर ,यवत, सोलापूर हायवे या गाव तसेच रस्त्यांकडे जाणारे येणारे प्रवासी, वाहनचालक प्रवास करत असतात.
आंबोडीजवळ पुलाखालील रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे ब-याच दिवसांपासून दूर्लक्ष करण्यात आल्याने वाहनचालकांचा,प्रवाशांचा या रस्त्यावरून प्रवास करताना वेळेचा अपव्यय होत आहे. डांबरीकरण करण्याकडे दूर्लक्ष करण्यात आलेल्या आंबोडी बाह्यवळण रस्त्याच्या पुलाखालील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.