• Total Visitor ( 429033 )
News photo

एस टी बसची दुचाकीला धडक - आर्किटेक्ट तरूणाचा मृत्यू 

Raju tapal March 14, 2026 15

एस टी बसची दुचाकीला धडक - आर्किटेक्ट तरूणाचा मृत्यू 

      

शिक्रापूर:- भरधाव वेगातील एस टी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आर्किटेक्ट तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर बाह्यवळण रस्त्यावर शुक्रवारी दि‌.१३ रोजी सायंकाळी घडली. चंद्रकांत जयसिंग भोसले वय -२६ रा‌.न्हावरे ता‌.शिरूर असे अपघातात दूर्दैवी मृत्यू झालेल्या आर्किटेक्ट तरूणाचे नाव आहे. समजलेल्या माहितीनूसार,न्हावरे‌ येथील आर्किटेक्ट चंद्रकांत भोसले शिरूर येथील काम आटोपून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून न्हावरे‌ गावाकडे परतत होता‌. शिरूर शहरातील पाबळ फाटा,नगरपालिका रस्त्याने येवून पुणे -अहिल्यानगर महामार्ग रस्ता ओलांडण्यासाठी थांबला असताना पुणे बाजूकडून आलेल्या भरधाव वेगातील एस टी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात चंद्रकांत भोसले याच्या डोक्याला,पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चंद्रकांत भोसले या आर्किटेक्ट तरूणाने आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण करून नुकताच न्हावरे‌ येथे व्यवसाय सुरू केला होता. आर्किटेक्ट चंद्रकांत यांचे वडील माजी सैनिक जयसिंग भोसले यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून या घटनेमुळे न्हावरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement