टिटवाळ्यातील रिक्षा चालकाचा प्रामाणिक पणा
रिक्षात सापडलेली लॅपटॉप व रोख रक्कम असलेली बॅग केली परत
टिटवाळ्यातील वंचितचे सदस्य व निलेश भाई प्रतिष्ठान चे सदस्य तसेच रिक्षा चालक भीम भाऊ होटकर
यांना काल दुपार च्या सुमारास आपल्या रिक्षामध्ये एक लॅपटॉप तसेच 8 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग आढळली.
सदरची बॅग ज्याची विसरली त्यांना शोधण्याचा प्रयत्न भीम भाऊ होटकर यांनी गणपती मंदिर परिसर ते टिटवाळा स्टेशन परिसरात शोध घेत असता रेल्वे परिसरात शोध घेत होते. सदरील बॅग मध्ये 30 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व ८ हजार रुपये कॅश व काही डॉक्यूमेंट होते. ज्यांची बॅग होती ते लोक पैसे देते होते भीम भाऊ होटकर यांनी पैसे घेन्यास नकार दिला. या अगोदर सुध्दा अनेकदा भीम भाऊ होटकर यांनी अनेक जणांचे रिक्षामध्ये विसरलेले मौल्यवान साहित्य परत केला आहे. त्यामुळे आजही माणुसकी जिवंत असल्याचे पहावयास मिळत आहे.