• Total Visitor ( 84387 )

१४२-कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघात वयोवृध्द मतदारांना (85+) व दिव्यांग मतदरांना दि. ११ नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या घरातूनच (गृहमतदान) करता येणार मतदान

Raju tapal November 09, 2024 16

१४२-कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघात वयोवृध्द मतदारांना (85+) व दिव्यांग मतदारांना दि. ११ नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या घरातूनच (गृहमतदान) करता येणार मतदान !

या विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या दृष्टीकोनातून मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85+ किंवा त्यावरील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रात जावून मतदान करु शकत नाही, अशा मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी १४२-कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघ कार्यालयातून नमुना 12-ड चे वाटप संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत घरोघरी जाऊन करण्यात आले होते. त्यापैकी दि. 26 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत १४२-कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघात प्राप्त झालेल्या आणि मंजूर केलेल्या ३१ वयोवृध्द (85+) मतदारांना आणि ७ दिव्यांग मतदारांना गृहमतदान करता येणार आहे. 
१४२-कल्याण पुर्व विधानसभा मतदार संघात सदर गृहमतदान हे सोमवार दि. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement