• Total Visitor ( 429837 )
News photo

माहेर संस्थेत आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा उत्साहात संपन्न 

Raju tapal March 14, 2026 25

माहेर संस्थेत आयोजित करण्यात आलेला महिला मेळावा उत्साहात संपन्न 

      

शिक्रापूर:- महिला तसेच अनाथांसाठी विशेष कार्य करणाऱ्या माहेर संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालकांच्या विविध नृत्यांचे सादरीकरण करत महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. वढू बुद्रुक(ता.शिरूर)येथे माहेर संस्थेच्या संस्थापिका सिस्टर ल्यूसी क्युरिअन यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. खेळ रंगला पैठणीचा आयोजित कार्यक्रमात सुवर्णा साबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ऐश्वर्या आदक यांनी द्वितीय,कामिनी चिने यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पुणे जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहूल गव्हाणे,शिरूर पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे,जिल्हा परिषद माजी सदस्या कुसूमताई मांढरे,शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे‌,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे,ग्रामपंचायत सदस्य युवराज मांढरे,भारतीय जनता पार्टीचे नेते राजाभाऊ मांढरे,आधार फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सुजाता सुभाष खैरे,अर्चना कृष्णा सासवडे,माजी उपसरपंच त्रिनयन कळमकर,माजी उपसरपंच भारतीताई मांढरे,माजी उपसरपंच पुजाताई भुजबळ कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषा रमेशराव गडदे‌,उद्योजक संजय घाडगे,युवा सेनेचे विजय लोखंडे,दयानंद कोरे,माहेर संस्थेचे सहाय्यक संचालक रमेश दुतोंडे,प्रकाश कोठावळे,तेजस्विनी पवार,सुशिल पोहेकर,विक्रम भुजबळ,सुनिल इंगळे,सांची सुरडकर कार्यक्रमास उपस्थित होते.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement