गेल्या सात दिवसांत चीनसह जपान, अमेरिका, फ्रान्स, ब्राझिल, जर्मनी, हाँगकाँग, तैवान, इटली, दक्षिण कोरियात 10 हजारांवर लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. या देशांत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे व ही चीनची देणगी आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे हाच कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय आहे. मनसुख मांडविय यांनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर निर्बंध घालण्याचे सुचवले, पण उद्याच्या नववर्षाच्या स्वागताचे सोहळे, उत्सव, त्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण कसे करणार?