*चला मुलांनो शाळेत चला*
जवळ जवळ दिड वर्ष कोरोना काळ लोटल्यानंतर आज दि.४.१०.२०२१ वार सोमवार रोजी शाळेत पहिल्यांदा विद्यार्थ्यांचे उत्साहात आगमन झालं. सदर शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक किशोर तळेले सर आणि पर्यवेक्षक राहुल भालेराव सर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली संपूर्ण विद्यामंदिर मांडा टिटवाळा शाळा सज्ज झाली होती.
आज शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शासकीय आदेशाचे परीपूर्ण पालन करत विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सीजन लेवल नोंद ठेवून विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यात आले..
प्रदिर्घ काळानंतर गुरु -शिष्य भेटीचा हर्ष विद्यार्थी व शिक्षक दोघांच्याही मुखकमळावर झळकत होता .
अशा प्रकारे आजचा शाळेचा पहिला कोरोना काळातील नियमांचे पालन करत उत्साहात संपन्न झाला.