• Total Visitor ( 369915 )
News photo

डाक विभागामार्फत "ज्ञान पोस्ट" सेवा उपलब्ध 

Raju tapal May 03, 2025 48

डाक विभागामार्फत "ज्ञान पोस्ट" सेवा उपलब्ध 



रत्नागिरी :- भारतीय डाक विभागाने 1 मे पासून देशभरातील सर्व पोस्ट ऑफिस मधून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पुस्तकांच्या वितरणाचा खर्च कमी करण्यासाठी ज्ञान पोस्ट ही नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना रत्नागिरी प्रधान डाकघर आणि चिपळूण प्रधान डाकघर येथे उपलब्ध आहे.

ज्ञान पोस्टद्वारे पोस्ट केलेली पुस्तके आणि अभ्यास साहित्य आणि किफायतशीर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पृष्ठभागावरून वाहून नेले जातील. या सेवेचे दर अतिशय वाजवी आहेत. कमीत कमी 300 ग्रॅम वजनाचे पॅकेट 20 रुपयांपासून सुरू होतात आणि 5 किलोग्रॅम वजनाच्या पॅकेटसाठी ( कर समाविष्ट ) जास्तीत जास्त 100 रुपयांपासून सुरू होतात. ज्ञान पोस्ट अंतर्गत ट्रॅक व ट्रेस ही सुविधा उपलब्ध आहे तसेच पाठविणाऱ्याला पोस्ट केल्याची पोहोच मिळेल.

ही सेवा देशाच्या सर्व भागातील विद्यार्थांना शिक्षणाचा प्रसार आणि शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता लक्ष्य केंद्रीत करते. ज्ञान पोस्टद्वारे पाठ्यपुस्तके, अभ्यास मार्गदर्शक आणि सांस्कृतिक पुस्तके जास्तीत जास्त गावांमध्ये आणि शहरांमध्ये पोहोचविता येतील. भारतातील मोठ्या पोस्टल नेटवर्क द्वारे पुस्तके आणि छापील अभ्यास साहित्य पाठविण्याचे किफायतशीर मार्ग प्रदान करून शिक्षण आणि ज्ञान वाटपाला प्रोत्साहन देते.

जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, प्रशिक्षक, लेखक यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए.डी.सरंगले यांनी केले आहे.



 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement