"रंग नया ढंग नया " कार्यक्रमाचे मलठणफाटा येथे आयोजन
शिरूर :- चैतन्य कानिफनाथ महाराज दशम वर्धापनदिनानिमित्त शिक्रापूर येथील मलठणफाटा येथे आज बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी रात्री ९ नंतर "रंग नया ढंग नया" या संगीत मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्रापूर, मलठणफाटा येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले मित्रमंडळ,श्री.कानिफनाथ तरूण मित्रमंडळ कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली.
महंत बेलनाथजी महाराज घोडेगावकर यांच्या प्रेरणेतून कानिफनाथ महाराज मुर्तीचा अभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद असे कार्यक्रम दिवसभरात पार पडणार असल्याचे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी "टिटवाळा न्यूज"ला सांगितले.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )