• Total Visitor ( 368973 )
News photo

"ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध" 

Raju tapal July 13, 2025 103

"ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध" 



हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत



ठाणे, दि.13 :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा अधिनियम ५) चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या क्रमांक/जिकाठा/सा.शा/जि.प.पं.स.नि-२०२५/प्रभाग रचना कार्य २०२५, दि.१४ जुलै २०२५, च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच कल्याण / भिवंडी / शहापूर / मुरबाड / अंबरनाथ तहसिलदार आणि पंचायत समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. 

      हा मसुदा राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे  यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दि.१४ जुलै २०२५ नंतर विचारात घेण्यात येईल, आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने / हरकती / सूचना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि.२१ जुलै २०२५ पर्यंत सादर कराव्यात.या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने / हरकती / सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement