"त्या" महिलेच्या बिलाची अखेर महावितरणने केली दुरुस्ती
कार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी घेतली दखल
टिटवाळ्यातील महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार व महावितरणचे डोके ठिकाणावर आहे का...? या शिर्षकाखाली टिटवाळा न्यूजने बातमी प्रदर्शित करून अशिक्षित,विधवा,ज्येष्ठ नागरिक महिला शोभा सोपान भिलारे या महिलेची व्यथा मांडली होती. सदरील बातमीची दखल घेत महावितरणचे मांडा टिटवाळा येथील अभियंता गणेश पवार यांनी दखल घेऊन सदरील महिलेचे बिल चेक करून त्यातील तांत्रिक दोषी दूर करून तसेच वीज मीटर काढून आणल्यानंतरही त्याची नोंद न केल्यामुळे सदरील महिलेला बिल जात होते. त्याबाबत सदरील महिलेला आलेले तब्बल १३ हजार ४६० रुपये बिल दुरुस्त करून त्याजागी ४ हजार ४६० रुपये एवढेच बिल भरायचे असल्याचे अभियंता गणेश पवार यांनी सांगितले. तसेच सदरील रक्कमे पैकी काही रक्कम पार्ट पेमेंट करून भरली तर लगेच सदरील महिलेला मीटर बदलून दिला जाईल असे हि पवार यांनी टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितले. एकंदरीत अधिकारी वर्ग जरी प्रामाणिक पणे कामे करीत असला तरी त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांनीही आपले कामे अचूक केली तर सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होणार नाही.