• Total Visitor ( 84354 )

वृत्तपत्र विक्रेत्यांचे 27 जानेवारीला राज्य अधिवेशन

Raju Tapal December 15, 2021 39

27 जानेवारीला वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य अधिवेशन 

- वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे स्वतंत्र ॲप, लवकर होणार लाँच

- ठाणे येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना कार्यकारणी बैठक संपन्न 

कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता एजंटांच्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन 26 व 27 जानेवारी रोजी ठाणे येथे होत आहे. हे अधिवेशन न भूतो न भविष्यती असे होईल विश्वास संघटनेचे राज्य अध्यक्ष हरि पवार यांनी व्यक्त केले.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य संघटना कार्यकारणी बैठक काल ठाणे येथे झाली,राज्य संघटना कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सल्लागार शिवगोंड खोत व ठाणे जिल्हा अध्यक्ष दत्ता घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 कोरोना काळात आलेल्या समस्या, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी यावर चर्चा करुन समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.

ठाणे येथे राज्यासह परराज्यातून वृत्तपत्र विक्रेते अधिवेशनाला येथिल त्यांचे स्वागत असेल.राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पवार यांनी केले.
कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी संघटनात्मक कामांची माहिती दिली.वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सभासद नोंदणीसह संघटनेकडून बनवले जात असलेल्या ॲपची सविस्तर माहीती श्री पाटणकर यांनी दिली. 

सरचिटणीस बालाजी पवार यांनी मागील सभेचे अहवाल वाचन करुन केलेल्या कार्यवाहीची माहीती दिली.संघटना बांधणी व स्थानिक प्रश्नावर मात करण्यासाठी स्थानिक संघटन मजबूत करा असे आवाहन केले.कल्याणकारी मंडळासाठी व्यापक लढा हाती घ्यावा लागेल असे जाहीर केले.

 उपाध्यक्ष विकास  सूर्यवंशी यांनी संघटनेच्या ॲपबाबत माहीती दिली.विकास सूर्यवंशी यांच्यासह  सल्लागार शिवगोंड खोत, रघुनाथ कांबळे यांनी शासनाने  वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ गठीत करण्यासाठी आक्रमक व सातत्यपूर्ण लढा उभारण्याचे आवाहन केले. कोषाध्यक्ष गोरख भिलारे, दत्ता घाडगे संजय पावसे, विनोद पन्नासे, रविंद्र कुलकर्णी, बंटी अग्रवाल आदींनी मनोगत व्यक्त केले.

Share This

titwala-news

Advertisement